सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार;एकाला कोठडी

लग्नाचे आमिष दाखवुन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक झाली आहे. याप्रकरणी युवकाला मेढा पोलिसांनी अटक केली आहे.

जावली तालुक्‍यातील एका गावातील युवतीला नितीन धनावडे रा.मोहाट ता. जावली याने लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने त्या युवतीवर महाबळेश्र, मोहाट या गावात वेळोवेळी अत्याचार केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर त्याने युवतीला पळवुन नेहत लग्नाचा बनाव करून अत्याचार केला होता अशी तक्रार पिडीतेच्या आईन मेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी नितीन धनावडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास स.पो.नि. जीवन माने करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)