सातारा : अपशिंगेत विवाहितेचा खून

सातारा : अपशिंगे ता. कोरेगाव येथे चारित्र्याचा संशयावरून पत्नीच्या मानेत व डोक्‍यात पतीनेच कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी शंकर जयसिंग बुधावले (वय 55 ) याने रविवारी दुपारी पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन राहत्या घरासमोर अंगणात सुशिला शंकर बुधावले (वय 50 ) हिच्या मानेत कुऱ्हाडीने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली होती. जखम मोठी असल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने जखमी पत्नीला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरमयन त्यांचा मृत्यू झाला.

संशयीत शंकर हा त्याच्या पत्नीवर सतत चारित्र्याचा संशय घेत होता त्यावरून त्यांच्यात अनेकदा किरकोळ वाद होत असायचे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुशीला घराच्या अंगणात बसलेल्या असताना शंकर याने त्यांच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली होती. दरम्यान चिडलेल्या शंकर याने सुशीला यांच्या मानेत व डोक्‍यात धारधार कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केले. अचानक वार झालेल्या वाराने घायाळ झालेल्या सुशीला यांनी जीवाच्या आकांताने आरडा ओरडा केल्याने घरात असलेल्या त्यांच्या भावाची पत्नी रेखा या बाहेर धावत आल्या तेव्हा शंकर पळून जात असताना शेजारच्या नाल्यात पडल्याचे त्यांना दिसून आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेखा यांनी तात्काळ 108 ऍम्ब्युलंसला फोन करून जखमी सुशीला व संकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी सुशीला यांचा मृत्यू झाल्याने रेखा यांनी शकंर जायसिंग बुधावले (वय 55) रा. अपशिंगे ता. कोरेगाव याच्या विरोधात खुनाची तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स.पो.नि.गणेश कानुगडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)