सातारा : अन्‌ पवारसाहेबांनी हाती नांगर धरला

नरवणे : माण-खटाव तालुक्‍यात पाणी फाऊंडेनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत ‘तुफान आलायं’. जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनीही या तुफानाचा अनुभव घेतला. अबालवृद्धांचे श्रमदान पाहून पवारसाहेबांना ही श्रमदानाचा मोह आवरला नाही. अन्‌ त्यांनी थेट नांगर हाती धरुन श्रमदान केले.

पवारसाहेबाच्या कृतीतून माण-खटाव वासियांचा उत्साह आणखी दुणावला असल्याचेच चित्र यावेळी पहावयास मिळत होते. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून माण-खटाव तालुक्‍यातील दुष्काळ निवारणासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन देण्याचे यावेळी पवार यांनी आवर्जून सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)