सातारा : …अन्यथा सामुदायिक आत्मदहन करु

न्यू फलटण शुगर वर्क्‍सची ऊस बिले थकली


सभासद शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

फलटण- न्यू फलटण शुगर वर्क्‍स साखरवाडी या कारखान्याने थकविलेले सर्व ऊसाचे बील तात्काळ द्यावे, अन्यथा 1 मे या कामगार दिनी सामुदायिक आत्मदहन करु, असा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

न्यू फलटण शुगर वर्क्‍स लि. साखरवाडी (ता. फलटण) या साखर कारखान्याने शेतकऱ्यांची देणी थकविली आहेत. त्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सदर कारखान्यास फलटणसह माळशिरस व अण्य तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस घातला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये कारखाना सुरु झाल्यानंतर कारखान्याच्यावतीने केवळ पहिल्या पंधरवड्याचेच बील दिले आहे. त्यानंतर अद्याप कुठलेही बील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही.

शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून कारखाना प्रशासन, साखर आयुक्त यांना निवेदने देण्यात आलेली आहेत. तसेत मोर्चे, धरणे आंदोलनेही करण्यात आलेली आहेत. परंतु, चर्चेदरम्यान कारखाना प्रशासनाकडून खोट्या अश्वासनांना व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही. बीले न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले असून त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. आर्थिक पत न उरल्याने बॅंका, पतसंस्था, सहकारी संस्था व व्यापारी यांनी पैशासाठी तगादा लावला आहे.

लग्न कार्ये, मुलांचे शिक्षण, सरकारी देणी, दवाखाने यासाठी पैशाची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. हक्काचे पैसे असूनही ते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असल्याचे व त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये नाराजीचे व नैराश्‍याचे वातावरण आहे. कारखाना प्रशासनाच्यावतीने एफआरपी प्रमाणे सर्व थकीत बीले व्याजासह त्वरीत शेतकर्यांच्या खात्यात जमा करावीत, अन्यथा 1 मे ला ऊस उत्पादक शेतकरी सामुदायिक आत्मदहन करतील व त्याची संपुर्ण जबाबदारी कारखाना प्रशासन यांची राहिल असा इशारा शेवटी निवेदनात देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)