सातारा : अट्टल घरफोड्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्‍या

बारामतीतून घेतला ताब्यात; सातारा,पुणे जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल

साताऱ्यासह पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्याला पोलिसांनी जेरबंद केले. जिल्ह्यातील शिरवळ परिसरात घरफोड्यांचे सत्रच या चोरट्याच्या टोळीने राबवले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामतीत त्याच्या मुसक्‍या आवळल्या. जगदीश उर्फ बाळू पोपट दराडे (रा. अकोले ता. इंदापूर जि.पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याने सातारा,पुणे जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा जिल्ह्यातील शिरवळ व परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी चोरट्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.पद्माकर घनवट यांना दिले होते. त्यानुसार घनवट यांनी स.पो.नि. विकास जाधव यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. पोलिसांनी शिरवळ परिसरात घरफोड्या झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली होती.

त्यानुसार फुटेजमधील वर्णनाची व्यक्ती बुधवारी बारामतीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी बारामती शहरात सापळा लावला होता. यावेळी पोलिसांना जगदीश उर्फ बाळू पोपट दराडे (रा. अकोले ता. इंदापूर जि.पुणे) हा संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असता त्याने राम नथुराम घटेला (रा. राजस्थान) याच्या मदतीने शिरवळ परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. विकास जाधव यांनी पुढील तपासासाठी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दराडे हा सातारा,पुणे जिल्ह्यातील पोलिस रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापुर्वी सातारा शहरातील वाढे फाटा परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये चोरी करताना दराडे रंगेहात फ्लॅट मालकाला मिळाला होता. त्यावेळी दराडेने त्याच्याकडील पिस्टलमधून गोळीबार केला होता.

अट्टल घरफोड्‌या दराडे याला अटक केल्याने जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी पो.नि.पद्माकर घनवट,स.पो.नि.विकास जाधव,सहा.फौजदार सुरेंद्र पानसांडे,मोहन घोरपडे,उत्तम दबडे,संतोष पवार, शरद बेबले,नितीन गोगावले,प्रवीण फडतरे,प्रमोद सावंत,मुबीन मुलाणी,रूपेश कारंडे,निलेश काटकर,मयुर देशमुख,मोहसीन मोमीन,विजय सावंत यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)