सातारामध्ये आढळला दुर्मीळ अल्बिनो साप

सातारा : सातारामध्ये सरपटणार्या प्राण्याच्या दुर्मीळ जातींचा अधिवास असल्याचे संशोधनातून वेळोवेळी समोर आले आहे.सरडे, पाली, साप यांच्या अनेक दुर्मीळ प्रजातींचे संशोधन वन्यजीव सरंक्षक आणि संशोधन संस्थेचे अमित सय्यद करत आहेत. शहरामध्ये ग्रीन किल बॅक ( गवत्या ) जातीचा साप पाचव्यांदा आढळला आसल्याची माहिती त्यांनी दिली.
हिरव्या रंगात आढळणारा ग्रीन किल बॅंक अर्थात गवत्या साप हा डोक्‍यापासून शेपटीच्या अखेर पर्यंत पूर्ण गडद हिरवा व पोटाची बाजू पांढरी अशा स्वरूपात असतो. मात्र सातारा शहरात आढळलेला हा साप पूर्ण पिवळया रंगाचा असून त्याचे डोळे लाल रंगाचे आहेत. हा साप अल्बीनीझम प्रकारातील असल्याचे त्यांनी संशोधनातुन सिध्द करून सांगितले आहे. भारतामध्ये विविध प्रकारच्या सापाच्या जाती आहेत. मन्यार, घोणस, मांजर्या, हरण टोळ, तस्कर,नानेटी, मांडुळ, नाग या सापांमध्ये सुध्दा अब्लीनीझम आढळतो या बाबत आता अमित सय्यद यांचे संशोधन सुरू आहे. भारत भरातून अश्‍या पध्दतीचे पक्षी, सस्तन प्राणी, तसेच सरपटणाऱ्या प्राण्यावरील त्यांनी शोध पेपर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द केले आहेत.
अब्लीनीझम म्हणजे काय आहे. या बाबत ते म्हणाले, अल्बीनीझम हा शरीरात रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे उदभवतो. प्राण्याच्या शरीरातील रंग बदलतात त्यामध्ये काही अंशी अनुवंशीकता देखील असल्याचे त्यांनी सांगीतले. 2013 मध्ये बेडूक प्रजातीमध्ये घाटीज बुश फ्रॉग तर 2016 मध्ये यलो बेलाड डेगेको, महाबळ डेगेको, लिमयी डेगेको, अजजी डेगेको, व अंबोली डेगेको अशा पालींचे संशोधन व नामकरण केले. यामधील घाटीज बुश फ्रॉंग हा प्रामुख्याने चाळकेवाडी परिसरात तर अजीजा डेगेको महाबळेश्वर परिसरात आढळतो.
सातारामध्ये जैवविविधता आहे त्याचे जतन करण्यासाठी काही भाग संरक्षीत करणे आवश्‍यक बनले आहे. चाळकेवाडी पठार हा भाग लिझार्ड सेंच्युरी म्हणून घोषीत करावा यासाठी अमित सय्यद व वन्यजीव संरक्षक व संशोधन समीती कार्यरत राहणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगीतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)