सातारकरांनो, ह्या उद्यानात जाणार असाल तर सावधान..!

सातारा,दि.31 प्रतिनिधी-

सध्या उन्हाळी सुट्टया अंतिम टप्प्यात असून शहरातील सर्वच उद्यानांमध्ये बालचमूंचा किलबिलाट निर्माण झाला आहे. अशा आनंददायी वातावरणात शहरातील एका उद्यानातील खेळण्यांची स्थिती एवढी भयानक झाली आहे की ती पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

शहरातील पुर्वेला सदरबझार परिसरातील श्री.छ. सुमित्राराजे भोसले उद्यानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरणासाठी सरकारने लाखो रूपयांचा निधी देखील दिला. मात्र, सध्या उद्यानातील खेळण्यांची अवस्था एवढी भयानक झाली आहे की हीच खेळणी बालकांच्या जीवावर बेतण्याच्या प्रयत्नात आहेत.

उद्यानातील घसरगुंडीचा उचकटलेला पत्रा पाहिल्यानंतर तो पत्रा खेळणाऱ्या बालकाच्या शरिराची काय अवस्था करेल ? असा प्रश्‍न निर्माण होतो. असे असताना देखील अजान बालके त्या उद्यानामध्ये खेळताना दिसून येत आहेत. उद्यानामध्ये देखभालीसाठी कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी दिसून येत नाही. उलट उद्यानामधील ग्रीन लॉनचा परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.

लाखो रूपये खर्च करून देखील एक ही नवीन खेळणे त्या ठिकाणी बसविण्यात आले नाही. वर्षानु वर्षापुर्वीची खेळण्यांना रंगरगोटी करण्यात आली आहे. त्यापैकी निम्मी खेळणी बंद अवस्थेत आहेत. तर जी चालू आहेत ती बालकांच्या जीवावर बेतली आहेत. अशावेळी पालकांनी आपल्या बालकांना उद्यानात नेण्याअगोदर हजार वेळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here