सातव्या वेतन आयोगासाठी महिनाभराची प्रतीक्षा 

मार्चपासून मिळणार सुधारित वेतन 

मुंबई – रस्त्यावर उतरून सातव्या वेतन आयोगाचे लाभ पदरात पाडून घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनाचा लाभ मिळण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात आदेश जारी केला असून शासन आदेशाला विलंब झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन जुन्या वेतनश्रेणीनुसार मिळणार आहे. तर वाढीव वेतनासाठी कर्मचाऱ्यांना मार्च महिना उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे.

राज्य सरकारने 1 जानेवारी 2016 पासून आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. सातव्या वेतन आयोगाचे प्रत्यक्ष लाभ 1 जानेवारी 2019 पासून देण्याचे सरकारने मान्य केले होते. त्यासाठी सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात 10 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, वित्त विभागाकडून शासन आदेश जारी करण्यास विलंब झाल्याने वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके 20 ते 25 तारखेच्या दरम्यान कोषागरात जमा होतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचा पगार जुन्या वेतनश्रेणीनुसार मिळेल, अशी माहिती वित्त विभागाच्या सूत्रांनी दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल. तर जानेवारी 2019 या महिन्यातील वाढीव वेतनातील फरक हा फेब्रुवारीच्या पगारासोबत दिला जाईल. सरकारने जानेवारी 2016 पासून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षातील थकबाकी ही पाच समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)