साडेआठ लाखांच्या लुटीतील सहा लाख परत ! – न्यायालयाचा आदेश

 शेवगाव तालुक्‍यातील बोधेगावच्या शेतकऱ्याच्या लुटीचे प्रकरण

नगर: चोरांनी बोधेगावच्या शेतकऱ्याला लुटले होते. एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत तीन दिवसाच्या आत आरोपींना गजाआड केले. लुटीच्या 8 लाख 45 हजार 700 रुपयांची रोख रकमेपैकी 5 लाख 97 हजार 500 रुपये जप्त केले. पोलिसांनी चोरांकडून जप्त केलेली हीच रक्कम न्यायालयाच्या आदेशाने बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शेतकरी समीर वसंत दसपुते यांना परत करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते ही रक्कम परत करण्यात आली आहे. एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यावेळी उपस्थित होते. समीर दसपुते यांना नगर-औरंगाबाद रोडवरील मोकाटे वस्तीजवळ 30 ऑक्‍टोबरला पाच जोरांनी लुटले होते. कापूस विक्रीचे सुमारे 8 लाख 45 हजार 700 रुपये त्यांच्याजवळ होते. चोरांनी हे पैसे लुटून नेले होते. दसपुते यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांच्या आता पाच आरोपींना गजाआड करण्यात आले होते.

दीपक सखाराम केदारे (रा. तांबेगल्ली, बुरुडगाव), युवराज दिलीप राऊत (रा. वाळुंज, ता. आष्टी), गणेश दत्तात्रय आजबे (रा. शिराळा, ता. आष्टी), कैलास दत्तू तोडकर (रा. मंगळूर, ता. आष्टी), आदम जलाल शेख (रा. फकराबाद, ता. जामखेड) या पाच जणांना अटक करण्यात आली. या पाच जणांनी लुटलेल्या रकमेपैकी 5 लाख 97 हजार 500 रुपये काढून दिले होते. गुन्ह्यात वापरलेले मोटारगाडी देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे. चोरांकडून जप्त केलेली ही रक्कम आज न्यायालयाच्या आदेशानुसार दसपुते यांना सुपूर्द करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×