सागरमार्गे विश्वाला कवेत घेऊ इच्छिणारा अभिलाष टॉमी 

सागरी परिक्रमेत तीन दिवस जखमी अवस्थेत असूनही  मृत्यूशी झुंज देणारा धडधडीचा नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांची नुकतीच थुरिया या जहाजातून सुटका करण्यात आली आहे. नौदलात पायलट कमांडर अभिलाष ‘गोल्डन ग्लोब रेस – २०१८’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होते. १८ वर्ष नौदलात भारतासाठी सेवा बजावणारे अभिलाष टॉमी २०१३ मध्ये सागरमार्गे पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय ठरले. तर विश्वातील ७९ वे व्यक्ती ठरले आहेत. एकदा समुद्रमार्गे परिक्रमा करूनही पुन्हा एकदा विश्वपरिक्रमा अशा बाळगणाऱ्या अभिलाष टॉमी यांची ही इच्छा मात्र अपुरी राहिली.

शिडाच्या बोटीतून कोठेही न थांबता जगप्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या सर रॉबिन नॉक्स जॉन्स्टन यांच्या पहिल्या यशस्वी मोहिमेच्या (१९६८-६९)  सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने  ‘गोल्डन ग्लोब रेस’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १ जुलैला गोल्डन ग्लोब रेस या धाडसी सागरपरिक्रमा स्पर्धेची फ्रान्समधून सुरुवात झाली. या स्पर्धेत विशेष निमंत्रक स्पर्धक म्हणून अभिलाष टॉमी यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांच्याशिवाय जगभरातील १८ दर्यावर्दी या स्पर्धेत सहभागी होणार होते. या स्पर्धेत कोणाचेही साह्य न घेता, जमिनीवर पाय न ठेवता, केवळ सॅटेलाईट फोन व होका यंत्राच्या माध्यमातून सागर परिक्रमा पूर्ण करायची होती. तब्बल ४२ हजार २८० किमीचे अंतर कोणत्याही आधुनिक सुधांनी सज्ज नसलेल्या शिडाच्या बोटीने करायची होती. अभिलाष यांनी याआधीही हे आवाहन लीलया पेलले असल्याने त्यांनी पुन्हा एकदा या आव्हानासाठी कंबर कसली आणि समुद्राद्वारे जगाची परिक्रमा करण्यास निघाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीन महिने आणि १० दिवस समुद्रात राहिल्यानंतर हिंदी महासागरात त्यांच्या बोटीला वादळाचा तडाखा बसला. तब्बल १४ मीटर उंच लाटा आणि १३० किमी वेगाने वाहणारी वादळामुळे अभिलाष यांची बोट तुटली. यामुळे अभिलाष गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना ना हात ना पाय हलवता येत होते. बोटीच्या तुकड्यांच्या आधारे ते समुद्रावर तरंगत होते. सॅटेलाईट फोनद्वारे त्यांच्याशी नौदलाने संपर्क साधला व दोन दिवसानंतर अखेर त्यांना वाचविण्यात यश आले.

अभिलाष टॉमी हे मूळ केरळचे. परंतु मुंबईत वास्तव्यास असलेले अभिलाष २००० साली नौदलात दाखल झाले आणि सागरमार्गे पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय ठरले. नौदलात कमांडर असलेल्या अभिलाष यांनी २०१२-१३ मध्ये कोठेही न थांबता ‘म्हादाई’ या शिडाच्या बोटीतून सागर परिक्रमा पूर्ण केली होती. त्याबद्दल त्यांना शौर्यपदकही प्रदान करण्यात आले होते. १८ वर्षाच्या करियरमध्ये ५२ हजार नॉरिटीकल यात्रा त्यांनी यशस्वीपाने पार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)