साखरेच्या दरात मोठी घट

नवी दिल्ली- साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे आणि निर्यातही किफायतशीर नसल्यामुळे भारतीय बाजारात साखरेचे दर आज 80 रुपयांनी कोसळले. भारताला दर वर्षाला 20 दशलक्ष टन एवढी साखर लागते. मात्र, आतापर्यंतच 30 दशलक्ष टन एवढी साखर तयार झाली आहे. आणखी बरेच साखर कारखाने चालू आहेत. त्यामुळे साखरेचे उत्पादन आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. सरकारने निर्यातीला परवानगी दिले आहे. मात्र, तेथेही देशातील भावापेक्षा जास्त भाव नसल्यामुळे एवढ्या साखरेचे करायचे काय, हा प्रश्‍न निमांण झाला आहे.

सरकारने आहे, त्या भावावर साखर निर्यात करून टाका, असे सांगितले आहे. त्याबरोबर ऊस उत्पादकांना अुनदान देणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, साखर कारखान्याकडे पैसे कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे 30 हजार कोटींचे देणे थकले आहे.

त्यामुळे प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. आज दिल्लीच्या घाऊक बाजारात साखरेचे दर 80 रुपयांनी कमी होऊन 2670 रुपयांपर्यंत खाली आले. तीन वर्षांपूर्वी असा प्रश्‍न निर्माण झाला होता त्यावेळी सरकारने उत्पादकतेच्या आधारावर शेतकऱ्याना अनुदान दिले होते. मात्र, आता सरकारने तसे काही करता येणार नसल्याचे सूचित केले आहे.

गेल्या पूर्ण वर्षात केवळ 20.3 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर या वर्षी आतापर्यंतच 30 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील 227 साखर कारखान्यात अजूनही उत्पादन चालू आहे. भारताला एका वर्षाला केवळ 20 दशलक्ष टन साखर लागते. त्यामुळे सध्या साखरेचे दर कोसळले आहेत.

त्याचबरोबर आगामी काळात ते आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादकांना पुढील वर्षातही अतिरिक्‍त उत्पादनाचा त्रास होणार आहे. सरकारने 2015-16 मध्ये असाच प्रश्‍न निर्माण झाला होता तेव्हा प्रति किलोला 4.50 रुपयांचे अनुदान दिले होते. तसे आताही द्यावे असे इस्माने म्हटले आहे.

साखरेचे जास्त उत्पादन झाल्यामुळे साखरचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्याचा महसूल कमी होऊन साखर कारखान्याची शेतकऱ्याची थकबाकी वाढली आहे.
मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्याना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुदान देण्याचा सरकारचा विचार नाही. यातून मार्ग काढण्यासाठी साखर कारखान्यानी 20 लाख टन साखर निर्यात करावी, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

मात्र, सध्या देशात जसे साखरेचे दर कमी झाले आहेत. तसेच निर्यात पेठातही साखरेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे निर्यात करूनही साखर कारखान्यांचा महसूल फारसा वाढणार नाही. जागतिक बाजारात दर कमी असला तरी त्याच दराने साखर कारखान्यानी साखर निर्यात करावी म्हणजे देशातील साखरेचे दर काही प्रमाणात वाढण्यास मदत होईल असे सरकारने साखर कारखान्यांना सुचविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)