साकुर येथे विजेची तार पडून महिलेचा मृत्यू 

संगमनेर – महावितरणच्या वीज खांबावरील जीर्ण झालेली तार अंगावर कोसळून संगमनेर तालुक्‍यातील साकुर येथील मुन्नाबी जाफर अन्सारी (वय-40) या महिलेचा मृत्यू झाला. त्या घरकाम करीत असताना ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, की साकुर येथे चर्च मागील भरवस्तीत मुन्नाबी जाफर अन्सारी यांचे घर आहे. रविवारी सकाळी घरासमोरील अंगणात घरकाम करीत असताना दहा वाजता अचानक अंगणातील वीज खांबावरील तार त्यांच्या डोक्‍यावर पडली. वीज वाहून नेणाऱ्या तारेचा झटका लागताच त्या खाली कोसळल्या. शेजाऱ्यांनी घटना घडताच धाव घेतली. मात्र वीजप्रवाह सुरू असल्यामुळे ते त्यांना हात लावू शकले नाहीत. डोळ्यांदेखत त्या तडफडत होत्या. शेजारी- पाजाऱ्यांची धावपळ सुरू होती. महावितरणला फोन करूनही ते घटनास्थळी पोहचले नाहीत. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मुन्नाबी अन्सारी यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थ संतप्त झाल्याचे समजल्यामुळे महावितरणचे अधिकारी उशिरापर्यंत गावात येण्यास धजावले नाहीत. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला. महावितरणच्या वीजवाहक तारा जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याची वारंवार तक्रारी करूनही महावितरणने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अखेर ही जीर्ण तार तूटून अंगावर पडून एका महिलेला जीव गमवावा लागला. मरण पावलेल्या अन्सारी यांच्या कुटुंबाला महावितरणकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)