सांगवी येथे युवकाचा खून

पिंपरी – सांगवी येथे औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ एका 35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. अजित नंदकुमार भुईया (वय 35 झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याचे नागरिकांनी सांगताच सांगवी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या शरीरावर वार केल्याचे आणि डोक्‍यात दगड मारल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. त्यावरून हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय आहे. याबाबत पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)