सांगलीत मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण

मांगले गावात एसटी पेटवली
सांगली – मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाने सांगली जिल्ह्यामध्ये आज उग्र रुप धारण केले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शिराळा तालुक्‍यातील मांगले गाव आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. हा बंद सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथून मांगले मार्गे शिराळ्याला निघालेली बस मांगले गावामध्ये येताच गावातील संतप्त झालेल्या जमावाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी करत एसटी बस पेटवून दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत बस रोखून धरत बसवर दगडफेक केली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना खाली उतरवून ती बस पेटवुन देण्यात आली. घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांसह परिसरात घबराटीचे वातावरण होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी बस पूर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. बस पेटवल्याची घटना कळताच कुरळप पोलिसांनी मांगले गावामध्ये धाव घेतली. बस पेटवल्याच्या बातमी शिराळा तालुक्‍यात पसरताच तालुक्‍यामध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या मांगले गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)