सहाव्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना जारी

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज सहाव्या टप्प्यातील मतदानासाठीची अधिसुचना जारी केली आहे. या टप्प्यात 12 मे रोजी सात राज्यांतील 59 मतदार संघांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची एकूण प्रक्रिया सात टप्प्यांची असून सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे आता केवळ त्या टप्प्यातील मतदानाचीच अधिसूचना जारी होणे बाकी आहे.

दिल्लीतील सर्व सातही मतदार संघांमध्ये सहाव्या टप्प्यातच 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षांमध्ये पुन्हा आघाडी होण्याची शक्‍यता बळावली असून त्यावर येत्या बुधवारी चर्चा होणे अपेक्षित आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आम आदमी पक्षाला दिल्लीतील सात पैकी चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच आमचे अंतिम लक्ष्य आहे असे नमूद करीत कॉंग्रेसजनांनी पुन्हा आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.