सहावी अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट स्पर्धा : एसबीएच स्मॅशर्स संघाला विजेतेपद

पुणे: आकाशने केलेल्या भेदक गोलंदाजीसह चंकीत धनुकाच्या धमाकेदार फलम्दाजीच्या जोरावर एसबीएच स्मॅशर्स संघाने स्टॅलियन्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत येथे होत असलेल्या सहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एसबीएच स्मॅशर्सच्या आकाश बी 14 धावा देत 2 बळी, कुशल जैन 5 धावांमध्ये 1, प्रणव गुप्ता 11 धावांमध्ये 1 आणि दिवेश दवे 15 धावांमध्ये 1 बळी मिळवत केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे स्टॅलियन्स संघाला 10 षटकांत 5 बाद 72 धावांचीच मारता आली. यात आयुश तिवारी 21, राघवेंद्र के 15, साहिल पारख 14, अजय सुब्रमनियम 10 यांनी संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान एसबीएच स्मॅशर्स संघाने 9.2 षटकांत 5 बाद 75 धावा करून पूर्ण केले. यामध्ये चंकीत धनुकाने 26 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 36 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कुणाल झामवर याने 56 धावांच्या अफलातून खेळीच्या जोरावर रॉयल्स संघाने बीस्मार्ट संघावर 9 गडी राखून विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक, पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अमनोरा ग्रुपचे सीए प्रदीप कटारिया, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडचे पुणे विभागाचे मुख्य हर्षद झोगडे, आयसीएआयच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य सीए शिवाजी झावरे आणि डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया, सीए योगेश पोद्दार, सीए सचिन पारख, सीए अमोल चंगेडिया, सीए एस जी मुंदडा, सीए सुहास बोरा, सीए सुमित शहा आणि सीए भूषण शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)