सहापदरीसाठी भूसंपादन केलेल्या जमिनींपोटी 8.56 कोटी धनादेशांचे वाटप

शिरवळ – पुणे- बेंगळूर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या खंडाळा येथील 17 गटातील संमतीधारक खातेदार शेतकऱ्यांना आज सुमारे 8 कोटी 56 लक्ष 53 हजार 473 रूपये रकमेचे धनादेशांचे वाटप करण्यात आले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. दरम्यान, वाण्याचीवाडी येथील शेतकऱ्यांनी ही रक्कम योग्य नसल्याने स्वीकारण्यात विरोध करीत जमिनीस योग्य भाव द्यावा, असे निवेदन भूसंपादन अधिकारी यांना दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे -बेंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील चुकीच्य पध्दतीने तयार करण्यात आलेल्या एस आकाराच्या वळणावर गेल्या दहा दशकात झालेल्या अपघातात सुमारे 76 लोकांनी जीव गमावला आहे तर 30 लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. यामुळे एस आकाराचे रस्त्याचे वळण कायमचेच हटविण्यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व वाहन धारकांनी ही अनेक वेळी आंदोलन केले होते. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने नवीन सहा पदरी खंबाटकी बोगद्याच्या निर्मितीसाठी केंद्रशासन स्तरावरील हालचाली गतीमान केल्या व या कामास मंजूरी मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्यक्षपणे याकामासाठी एक हजार कोटींचा निधी जाहीर झाला होता. काही दिवसापूर्वी उदघाटनही झाले होते. परंतु, प्रत्यक्ष संपादन प्रक्रिया पुर्ण न झाल्याने काम सुरू झाले नव्हते. संपादन प्रक्रिय गतीमान करीत नवीन बोगदा निर्मितीदरम्यान खंडाळा येथील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा पाच लक्ष 90 हजार रूपये प्रतिगुंठा या प्रमाणे पैशाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. नवीन बोगदा निर्मिती दरम्यान खंडाळा वाण्याचीवाडी व अन्य गावातील येथील 59 गटामधून सुमारे 21 हेक्‍टर जमीन संपादित होणार असून 138 खातेदारांचा समावेश आहे. वाण्याचीवाडी गावच्या हददीतून 27 गटांमधून सुमारे 17 हेक्‍टर जमीन संपादित होणार असून यामध्ये 96 खातेदारांचा समावेश आहे. वाण्याचीवाडी गावच्या हद्दीतून 27 गटामधून सुमारे 17 हेक्‍टर जमीन संपादित होणार असून याध्ये 96 खातेदारांचा समावेश आहे. संबधित क्षेत्राचा संयुक्त मोजणी अहवाल शासनास पाठवण्यात आला असून लवकरच संपादन प्रक्रिया पुर्ण होणार आहे.

त्यामुळे दळणवळण प्रक्रिय अधिक गतीमान होणार आहे. आज खंबाटकी घाटातील सहापदरी बोगद्याच्या निर्मितीसाठी संपादित केलेल्या खंडाळा येथील 17 गटातील संमतीधारकांना आज सुमारे 8 कोटी 56 लक्ष 53 हजार 473 रूपये रकमेचे धनादेशांचे वाटप आज करण्यात आले तर वाण्याचीवाडी येथील नागरिकांनी रक्कम योग्य नसल्याने ती स्विकारण्यास नकार दरर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)