सहकारी बॅंकांनी खासगीकरणाच्या नादात पडू नये

सतीश मराठे : नागरी सहकारी बॅंकांबद्दल आरबीआयला अनास्था

पुणे – पाश्‍चिमात्य देशांमध्ये नागरिकांना परवडेल, अशा दरांमध्ये सेवा देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसह पायाभूत सुविधा सहकारी तत्त्वावर देण्यात येत आहेत. याउलट आपल्या देशात रुग्णालये, बॅंका, परिवहन आणि विमा क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्र धोक्‍यात आले आहे, असे भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी येथे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहकार भारतीच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने विशेष सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, सुभाष जोशी, प्रदेशाध्यक्ष मुकुंद तापकीर आदी उपस्थित होते.

“भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) सहकारी बॅंकांचे खासगीकरण करून अल्प वित्तीय बॅंकांमध्ये रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, सहकारी तत्त्वावरील बॅंकांनी खासगीकरणाच्या मोहात पडू नये. त्या बॅंका त्यांच्या हातात राहू शकणार नाहीत. आरबीआयकडून नागरी सहकारी बॅंकांबद्दल अनास्था असून, विश्‍वासदेखील नाही. जागतिक बॅंकांकडून सहकारी बॅंकांना निधी वितरणामध्ये अनेक स्तर आहेत. ते स्तर कमी करण्यासाठी जिल्हा बॅंकांना वगळण्याच्या खटपटी सुरू आहेत. देशात जनधन योजना राबवूनदेखील फार मोठा वर्ग संघटित वित्तीय क्षेत्राच्या परिघाबाहेर आहे. त्यांना सामावून घेऊन आर्थिक समावेशकतेसाठी आणखी आठ ते दहा हजार सहकारी बॅंकांचे जाळे वाढविले पाहिजे,’ असे मराठे यांनी सांगितले.

ई-बॅंकिंग सिस्टिमवर हल्ला
कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला हा केवळ एखाद्या सहकारी बॅंकेवरील हल्ला नसून, भारतीय ई-बॅंकिंग सिस्टिमवरील हल्ला आहे. गेल्या वर्षभरात पाच सहकारी बॅंकांवर सायबर हल्ले झाले आहेत. त्यामुळे ई-पेमेंटच्या संगणकीकरणासह सुरक्षा यंत्रणांवरील उपायांवर भारताने आणखी काम केले पाहिजे, असेही मराठे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)