सहकारी बॅंकांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे ग्राहकांना कार्यक्षम सुविधा

मुंबई: भारतातील सहकारी बॅंका आता नवे तंत्रज्ञान वापरू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील अगदी छोट्या शहरातही ग्राहकांना मोठ्या शहराप्रमाणे आधुनिक बॅंकिंग सुविधा मिळू शकणार असल्याचे सर्वत्र टेक्‍नॉलॉजीजचे संस्थापक मंदार आगाशे यांनी सांगितले. सहकारी बॅंकांचे ग्राहक डिजिटल पेमेंट सेवांवर जास्त प्रमाणात विसंबून राहायला लागले आहेत. सर्वत्र प्लॅटफॉर्मवरून पूर्वी स्थलांतरित केल्या जाणाऱ्या अगदी लहान रकमेची जागा गेल्या पाच वर्षांत दहा पटींनी वाढली आहे.

2018 मध्ये एकूण व्यवहारांचे मूल्य 40 हजार कोटी रुपयांची पातळी गाठणार असून पुढील काही वर्ष हा ट्रेंड असाच सुरू राहाणार असल्याचेही ते म्हणाले. कंपनीने तिच्या नॅशनल फायनान्शियल स्विचवर (एनएफएस) 450 वी सहकारी बॅंक आणली आहे. 2019 पर्यंत आणखी 50 सहकारी बॅंकांचा यात समावेश करण्याचे ध्येय आहे. सर्वत्रने आयसीआयसीआय बॅंक, आयडीबीआय बॅंक यांसारख्या मोठ्या बॅंका तसेच पेटीएम्‌ पेमेंट्‌स बॅंक, इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंकांना डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पुरवले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियो मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप अस्बे म्हणाले की, सर्वत्र टेक्‍नॉलॉजीजने बॅंकांना सास (एसएएएस) आधारित तंत्रज्ञान पायाभूत सुविधा पुरवून त्यांना आपल्या यंत्रणेचे केंद्रीकरण करण्यास आणि राष्ट्रीय पेमेंट नेटवर्कमध्ये सहभागी होण्यास मदत केली. डेटा केंद्रांचे पूर्ण व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा यामुळे त्यांचा कामकाजाचा खर्च कमी झाला आहे. कंपनी सध्या 23 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत कार्यरत असलेल्या बॅंकांना सेवा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)