सस्पेन्स आणि कॉमेडीचा संगम असलेल्या ‘लूटकेसचा’ ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – राजेश कृष्णन दिग्दर्शित लूटकेस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट पहायला मिळतेय. अनेक कलाकार बऱ्याच दिवसांनी सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहेत. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

अभिनेता कुणाल खेमू हा मुख्य भूमिकेत असून रणवीर शौरी , रसिका डुग्गल , गजराज राव , विजय राझ यांच्याही चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पैशांनी भरलेली एक सुटकेस आणि त्या पैशांच्या हव्यासापोटी अडकलेली माणस यांची कॉमेडी जुगलबंदी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावावरूनच याची कथा काय असणार याचा अंदाज आपल्याला येतो. पैशांनी भरलेली ही लुटकेस आणि मग ती मिळवण्यासाठी सगळ्यांची असणारी धडपड दिसून येतेय, आता ही सुटकेस कोणाल मिळणार हे याच उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

हा ट्रेलर पाहताना प्रेक्षकांना एकदाही पापणी मिटण्याची संधी मिळणार नाही, इतक्या जलद गतीने या घटना घडताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.