सलमानच्या “भारत’मधील एका रात्रीत लखपती

सलमानच्या “भारत’चा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमातील एका सीनमुळे लुधियानातील शेतकरी एका रात्रीत लखपती झाले आहेत. हा सिनेमा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्‍वभुमीवर आहे. मात्र फाळणीच्या काळातील काही दृश्‍यांच्या शुटिंगसाठी निर्मात्यांनी एक शक्कल लढवली. त्यामुळे लुधियानातील शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला आहे.

काही महत्वाच्या सीनसाठी “भारत’च्या टीमला वाघा बॉर्डरवर शुटिंग करायचे होते. मात्र सुरक्षेच्या कारणासाठी “बीएसएफ’ने सीमेवरील शुटिंग करण्याला परवानगी नाकारली. म्हणून “भारत’च्या टीमने लुधियानातील बल्लोवाल गावातच वाघा बॉर्डरचा सेट उभारला. या सेटसाठी गावातील काही शेतजमिन काही दिवसांसाठी भाड्याने घेण्यात आली. एकूण 19 एकर जमिन शेतकऱ्यांकडून घेतली गेली. यातील एका एकरासाठी शेतकऱ्यांना 80 हजार रुपयांचे भाडे दिले गेले. याच भाड्यामुळे लुधियानातील शेतकऱ्यांना एकूण 15 लाख रुपये मिळाले आणि ते रातोरात लखपती झाले. “भारत’चे डायरेक्‍शन अली अब्बास जाफर करत आहेत. सलमानने ट्विटरवर एक फोटो शेअर करत आपल्या फॅन्सला प्रजासत्ताक दिनाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये तो नेव्हीच्या युनिफॉर्ममध्ये दिसतो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)