सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर, शेगाव, शिर्डीत भाविकांची गर्दी

मुंबई सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने कुणी गावाकडे, कुणी थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी, तर कुणी देवस्थानांकडे जाताना दिसत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची मांदियाळी दिसते आहे. सलग सुट्ट्या असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून गेले आहे. आज विठ्ठल मंदिराला यात्रेचे स्वरुप आले आहे.

आजपासून चार दिवस सलग सुट्ट्या आल्याने राज्यभरातून शहरी पर्यटक पहाटेपासून पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. शहरातील हॉटेल व लॉज भरले आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सांगली आणि कोल्हापूरसह अनेक कुटुंबं या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनासाठी बाहेर पडले आहेत.

या सुट्ट्यांमुळे आज पहिल्याच दिवशी विठुरायाच्या दर्शनाची रांग सात मजली दर्शन मंडपात पोहोचली असून, तीन ते चार तासात भाविकांचे दर्शन होत आहे. आज दुपारपासून गर्दीची संख्या वाढतच जाणार असल्याने मंदिर प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे.सलग चार दिवसांच्या सुट्या आल्याने विदर्भाची पंढरी शेगाव येथे भक्तांची मांदियाळी सुरु झाली आहे. शेगावात भक्त येणे सुरु झाले असून, गजानन महाराज यांचे दर्शन आणि आंनद सागर हे भक्तांचे आकर्षण असते.
शिर्डीतही साईभक्त येण्यास सुरुवात झाली आहे. आज नेहमीप्रमाणेच गर्दी असली, तरी येत्या तीन दिवसात मोठ्या संख्येने साईभक्त दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)