सलग सुट्ट्यांमुळे कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल

रत्नागिरी – सलग चार दिवस सुटी आणि आंब्यांचा हंगामामुळे कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. तसेच शाळांनाही उन्हाळी सुटी असल्याने दापोली, गुहागरपासून रत्नागिरी, मालवण ते देवबागपर्यंतचे सर्वच किनारे पर्यटकांनी भरुन गेले आहेत.

कोकणातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांसह प्रसिद्ध देवस्थानातही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये या चार दिवसांमध्ये “मॅंगो सिटी रत्नागिरी’ पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे रत्नागिरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना व्हॅली क्रोसिंग, बॅक वॉटर सफारी, केव्हिंग अशा अनेक गोष्टी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्गचे किनारेही पर्यटकांनी फुलून गेले आहेत. देवबाग, वेंगुर्ला अशा सगळ्याच किनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत. गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर येणाऱ्या हजारो पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी इथे विशेष काळजी घेतली जात आहे.

महाराष्ट्राबाहेरुनही मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात आलेले पाहायला मिळत आहेत. तसेच कोकणाकडे येणाऱ्या सगळ्याच मार्गांवर पर्यटकांच्या गाड्यांच्या मोठ्या रांगा अनुभवायला मिळत आहेत. कोकणचा हापूस, इथले समुद्र किनारे आणि अस्सल कोकणी स्वादाचं जेवण यामुळे चार दिवसांची ही सुट्टी पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)