सलग दुसऱ्या आठवड्यातही पालेभाज्याच्या भावातील तेजी कायम

पुणे – उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे वाढलेले भाव सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम आहेत. मुळे, चवळई, पालक वगळता पालेभाज्यांच्या भावातील तेजी टिकून आहे. घाऊक बाजारात भाव वाढल्यामुळे किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री सुरू झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख जुडी, तर मेथीची 40 हजार जुडी इतकी आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 5 ते 18 रुपये मोजावे लागत आहेत आहे. किरकोळ बाजारात 15 ते 25 रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे. मेथीच्या भावातही तेजी आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीसाठी अनुक्रमे 5 ते 10 आणि 10 ते 15 रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी होत असल्याने पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहिल, असा अंदाजही भुजबळ यांनी वर्तविला आहे.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 500-1800, मेथी : 500-1000, शेपू : 500-800, कांदापात : 500-800, चाकवत : 400-600, करडई : 400-500, पुदिना : 100-250, अंबाडी : 500-600, मुळे : 500-1000, राजगिरा : 500-600, चुका : 500-800, चवळई : 300-600, पालक : 500-600.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)