सर्व समावेशक विकासासाठी पोस्ट बॅंकेचा हातभार 

मुंबई:आर्थिक समावेशकतेचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट लक्षात घेऊन भारतीय टपाल विभागाच्या वतीने देशभरात इंडिया पोस्ट पेमेंट्‌स्‌ बॅंकेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या 1 सप्टेंबर रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या देशभरातील 650 शाखा आणि 3250 सेवा केंद्रांचे काम सुरू होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत बॅंकिंग सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा समावेश असलेल्या महाराष्ट्र सर्कलमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक अर्थात आयपीपीबीच्या 42 शाखांचे उद्‌घाटन यावेळी केले जाणार आहे. मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते अंधेरी आयपीपीबी शाखेचे राजभवन येथून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गिरगाव शाखेचे मुंबई जीपीओ येथून उद्‌घाटन केले जाणार आहे. आत्तापर्यंत बॅंकेशी न जोडल्या गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज, परवडणारी आणि विश्वासार्ह बॅंक निर्माण करणे हे या बॅंकेचे उद्दिष्ट आहे.
बचत खाते, चालू खाते, पैसे पाठवणे आणि हस्तांतरित करणे, सरकारद्वारा अनुदानित योजनांद्वारा मिळणारे लाभ, सर्व प्रकारची देयके आणि उपयोगिता देयके, उद्यम आणि व्यापारी देयके अशा अनेक प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेद्वारे उपलब्ध होणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)