सर्व जती-धर्मियांनी दिला “हम सब एक है’चा नारा

इंदापूरवासीयांची एकता दौड

रेडा: सामाजिक ऐक्‍य टिकवण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी आज (बुधवारी) एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत “हम सब एक’चा संदेश दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंदापूर महाविद्यालयाच्या प्रारंगणात असलेल्या स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या समाधी स्थळास्थळावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास पुप्षहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून व फुगे आकाशात सोडून ऐकता दौडला सुरुवात केली. यावेळी आयर्नमॅन विजेते दशरथ जाधव (पुणे), सतिश ननवरे (बारामती) यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूरच्या एकता दौडचा नवा संदेश देशात पॅटर्न ठरणार आहे. धर्म जाती पंत एकच आहेत असा संदेश सर्वदूर पोहोचणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात मराठा, धनगर तसेच मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलने चालली आहेत,त्या आंदोलनात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे.काहिजण आत्महत्या करीत आहेत, त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडले आहे. त्यामुळे अस्थिर वातावरण तालुक्‍यात होऊ नये, म्हणून एकता दौडचे आयोजन केले होते. यानिमित्ताने सर्वांना एकत्र पाहून समाधान वाटले असे त्यांनी नमूद केले.

राज्यात आरक्षणासाठी आंदोलने होत असल्याने सामाजिक समतोल ढासळलेला दिसतो आहे; परंतु आजच्या एकता दौडच्या माध्यमातून सर्वजण एक आहोत हे दाखवून दिले आहे. तसेच ग्रामीण भाग खेळासंबंधी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने मुला-मुलींसाठी ते एकप्रकारे वरदान ठरत आहे.
– ललिता बाबर, आंतरराष्ट्रीय धावपट्टू, भारत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)