सर्वसमावेशकतेमुळे वाढते स्मार्ट सिटीची स्वीकारार्हता- सीईओ डॉ. राजेंद्र जगताप 

पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांच्या हस्ते लघु शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

भावी पत्रकारांनी ‘स्मार्ट सिटी’बद्दल सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांच्याशी साधला संवाद; लघु शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

पुणे- स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या सुरवातीपासून आम्ही सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची मतमतांतरे, बाजू समजून घेऊन आम्ही काम सुरू केले. यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांची स्वीकारार्हता वाढते, असे प्रतिपादन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष स्व. प्रदीप रणपिसे यांच्या स्मरणार्थ “स्मार्ट सिटी आणि पुढील दिशा” या विषयावर वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी लघुशोध निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जगताप बोलत होते. यावेळी माजी पोलिस महासंचालक अशोक धिवरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे व पत्रकार संघाचे सदस्य व पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत गंगाधर बनसोडे, अमित येवले आणि पद्मसिंह भापकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. सुनीत भावे व योगेश बोराटे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “नव्या मोकळ्या परिसरात नियोजित शहर वसवणे तुलनेने सोपे असते. इतिहासात डोकावून पाहिल्यास दिल्ली, चंडीगड अशी शहरे तत्कालीन नेतृत्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण केल्याने ती त्या काळातील स्मार्ट शहरे बनली असे म्हणता येईल. मात्र, आधीपासून अस्तित्वात असलेली शहरे स्मार्ट करण्याचे काम अधिक आव्हानात्मक असते. हे आव्हान आपण स्वीकारले आहे. पुढील ३० वर्षांत जागतिक पातळीवर नागरीकरणाकडे मोठा कल राहील, आणखी जोमाने आणि उत्साहाने काम करण्याची आमची जिद्द आहे. शहरातील जीवनमान अधिक उंचावण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीने पाऊले उचलली आहेत.”

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना माध्यमांबद्दल जगताप म्हणाले, “ऑनलाईन व सोशल मीडियाचा विस्तार वाढला असला तरी मुद्रित माध्यमे अद्याप कुठेही मागे पडली नाहीत. वाचकांना पेपर वाचण्याची सवय, तसेच त्यामध्ये सखोल वार्तांकन आणि विश्लेषण यामुळे मुद्रित माध्यमांचे ठळक अस्तित्व
कायम टिकून आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)