सर्जेराव पाटील एलसीबीचे नवे कारभारी

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी)

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातून साताऱ्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घेतला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी बदलीसाठी अर्ज केल्याने त्यांच्या जागी पाटील यांची वर्णी लागली आहे.

यापुर्वी विजय कुंभार यांनीही सोलापूर ग्रामीणवरून साताऱ्यात आल्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने एलसीबीचा पदभार घेतला होता.

एक वर्ष कारभार पाहिल्यानंतर कुंभार यांनी नाट्यमयरित्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे बदलीसाठी अर्ज केला होता.

त्यानंतर त्यांच्या जागी नव्याने जिल्ह्यात हजर झालेल्या पाटील यांची नेमणूक एसपींनी केली. पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता एलसीबीचा पदभार स्विकारला.

पाटील यांनी सोलापूर ग्रामीणवरून येतानाच आपण सातारा एलसीबीचा चार्ज घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यादरम्यानच विजय कुंभार यांनी बदलीसाठी अर्ज दिल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा पोलीस दलात झालेल्या या नाट्यमय बदलाची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.