सराफ व्यवसायिक ,पोलिस प्रशासनाची समन्वय समिती स्थापन 

सराफ व्यावसायिक संघटना ,पोलीस यांच्यातील बैठकित झाला समितीचा निर्णय
नगर  – सराफ, सुवर्णकार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच सातत्याने पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईबाबत मार्ग निघावा, यासाठी नुकतीच शहरातील सराफ, सुवर्णकार व्यवसायिक व पोलिस प्रशासनाची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच रामचंद्र खुंट येथील नूतन अत्याधुनिक गोल्ड ज्वेलरी क्‍लस्टर येथे तोफखान्याचे पोलिस निरिक्षक संपत शिंदे यांच्या उपस्थितीत सराफ व्यवसायिक यांची व्यापक बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध प्रश्‍नांवर चर्चा झाल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. या समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश लोळगे व उपाध्यक्षपदी सुभाष कायगांवकर यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला संजय शिंगवी, ईश्‍वर बोरा, राजेंद्र शहाणे, निळकंठ देशमुख, अमोल देडगांवकर, कैलास मुंडलिक, प्रमोद बुर्हाडे, मयुर कुलथे, अतुल महाले, वैजनाथ चिंतामणी, राजन मिसाळ, राजन हिंगणगांवकर, विशाल रायमोकर, प्रकाश देवळालीकर, लक्ष्मीनारायण वर्मा, राजेंद्र लोळगे, संजय पालकर, दत्तात्रय मैड, पवन मिसाळ आदिंसह मोठ्या संख्येने सराफ, सुवर्णकार व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी गोल्ड ज्वेलरी क्‍लस्टरच्या अत्याधुनिक मशिनरीची यावेळी पोलिस निरिक्षक संपत शिंदे यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. प्रकाश लोळगे व संजय शिंगवी यांनी संपत शिंदे यांचे स्वागत करुन सत्कार केला.
या बैठकीत प्रकाश लोळगे यांनी सराफ व्यवसायिकांच्या समस्या मांडतांना सांगितले की, पोलिस प्रशासनाकडून कायमच सराफ व्यवसायिकांवर अन्याय होत आला आहे. त्यामुळे अनेकदा पोलिस व सराफ व्यवसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. नुकताच या वादातूनच सराफ व्यवसायिकाने आत्महत्या केली आहे. सराफ व्यवसायिकांचे संपूर्ण सहकार्य पोलिसांना असणार आहे. तसेच पोलिसांचेही संपूर्ण सहकार्य आम्हाला पाहिजे, यासाठी समन्वय समिती होणे गरजेचे आहे. नागपूरमध्ये अशी समन्वय समिती आहे. त्याच धर्तीवर नगरमध्येही व्हावी. य
पोलिस निरिक्षक संपत शिंदे म्हणाले, कोळपेवाडी येथे घडलेली घटना पुन्हा होवू नये म्हणून प्रत्येक व्यवसायिकाने काळजी घ्यावी, व्यवसाय असलेल्या भागात, दुकानात सीसीटीव्ही लावून त्याचे फुटेज सांभाळून ठेवले पाहिजे. चोर आता हायटेक होऊ लागले आहेत. त्यामुळे सराफ व्यवसायिकांनी अनोळखी व्यक्तीकडून किंवा पावती नसलेल्या व्यक्तीकडून सोने खरेदी करु नये. सराफ व्यवसायिक व पोलिस प्रशासनाच्या समन्वय समितीची मागणी योग्य असून, तातडीने यावर अंमलबजावणी करत आहे.
यावेळी सुभाष कायगांवकर, संजय शिंगवी आदिंनी यावेळी मते व्यक्त केली. बैठकीचे प्रास्तविक ईश्‍वर बोरा यांनी केले तर आभार राजेंद्र शहाणे यांनी मानले.

व्यावसायिकाच्या आत्महत्येनंतर समितीची स्थापना
संगमनेर आणि श्रीरामपुर येथे घडलेल्या घटने नंतर श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिकाने आत्महत्या केल्यानंतर पोलीस आणि सराफ व्यावसायिक यांच्यातील तपासाचे मुद्दे ऐरणीवर आले होते . या घटनेनंतर सराफ सुवर्णकार संघटनेने पोलीस महासंचालकांनाही या संदर्भातील निवेदन दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)