सराईत गुन्हेगार कोयत्यासह जेरबंद ; पिस्तूलही हस्तगत

सराईत गुन्हेगार कोयत्यासह जेरबंद
पुणे, दि. 23 – भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारास लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना जेरबंद केले. त्याच्या चौकशीमध्ये घरातून एक छऱ्याचे पिस्तूलही हस्तगत करण्यात आले. त्याने काही दिवसांपूर्वीच हे पिस्तूल दाखवून एकाला धमकी दिली होती. आकाश भरत थोरात (23, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुबराव लाड व तपास पथकातील कर्मचारी सर्फराज देशमुख व राहुल तांबे पेट्रोलिंग करत असताना त्यांना थोरात हा कोयता हातात घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते सच्चाईमात मंदिराजवळील पाण्याच्या टाकीजवळ माग काढत गेले. पोलिसांना बघताच थोरात हा पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला कोयत्यासह ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने दोन दिवसांपूर्वीच एकाला छऱ्याचे पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या घरझडतीत छऱ्याचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्‍त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्‍त मालोजीराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, सर्फराज देशमुख, राहुल तांबे, सचिन पवार, कुंदन शिंदे, गणेश िंचचकर, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक, अभिजीत जाधव, योगो सुळ यांच्या पथकाने केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×