पुणे : सराईत गुन्हेगाराने पत्नीचा गळा दाबून फासावर लटकवले

पुणे – पतीने पत्नीस मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना नऱ्हे येथे घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पतीने हा खून अतिशय थंड डोक्‍याने केला आहे. खूनानंतर तो घराबाहेर पडला व याची माहिती त्याने पत्नीच्या नातेवाईकांना दिली. तसेच खून केल्यावर तीला नवी साडी घालून लिपस्टकही लावण्यात आली होती. दरम्यान आरोपीला सिंहगड पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली.

कोमल राहुल हंडाळ (वय 21) असे त्या महिलेचे नाव आहे. पती राहुल हंडाळ याच्याविरुध्द सिंहगड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल ही एका खासगी हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करीत होती. त्या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर ती माहेरी गेली होती. पुन्हा आपली भांडणे होणार नाहीत असे सांगून तिला दोन दिवसांपूर्वी माहेरहून परत आणण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार घडला. त्यांचा तीन वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. खूनानंतर राहुलने कोमलच्या सर्व नातेवाईकांना मेसेज व व्हॉटसअप केले. तसेच फोन करुन खूनाची माहिती दिली. याते कोमलला फाशी देऊन खून केला आहे.

घटनास्थळी पोलिसांना नायलॉनची तुटलेली दोरी आढळली आहे. कोमलच्या डोक्‍यातून रक्तस्त्राव झाल्याचेही दिसत आहे. खून केल्यानंतर राहुललने तीला लिपस्टीक लावून नवी साडी घातली. राहुल हा सराईत गुन्हेगार आहे. तो कोणताही कामधंदा करत नाही. तो व्यसनी होता तसेच त्याला कोमलच्या चारित्र्याबद्दल संशय होता. यामुळे रागाच्या भरात त्याने पहाटे तीन वाजता कोमल बरोबर भांडणे उकरुण काढली. यानंतर रागाच्या भरात कोमलचा गळा आवळून खून केला. यानंतर तीला सीलींगला लटकावून फाशी दिली. तीला नवी साडी, मंगळसूत्र आणि  लिपस्टिक लावून तेथून पळ काढला.

दरम्यान पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे पाटील व दत्ता सोनवणे यांना आरोपी डेक्कन परिसरातील नदीपात्रात लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार त्याला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, संतोष सावंत, राहुल शेडगे, पुरुषोत्तम गुन्ला यांच्या पथकाने केली.

यासंदर्भात माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी सांगितले, आरोपीचा प्रेमविवाह होता. मुलीच्या गळ्यावर ब्रण दिसत आहेत तसेच डोक्‍यासही मार लागला आहे. राहुलवर दहा गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घरफोडी व लॅपटॉप चोरीचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)