सराईतांकडून 21 तोळे सोने जप्त

पिंपरी – भरदिवसा एकूण 18 घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी बेड्या घतल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी एकूण 21 तोळे दागिने जप्त केले आहेत.

रवीकिरण माताबदल यादव (वय-22, रा. ओमसाई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 303, शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख. मूळ रा. पतेरीया, ता. माणिकपूर, जि. चित्रकूट उत्तर प्रदेश) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (वय-24, रा. साई अपार्टमेंट, बी विंग, मोरया पार्क, पिंपळे गुरव. मूळ रा. दरवेशपुरा, ता. चायल, जि. कोसांबी उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुनी सांगवी मधील चंद्रहिरा अपार्टमेंट या वसाहतीमध्ये शनिवार (दि. 11 ऑगस्ट) रोजी घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असता घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींची ओळख पटवून यादव आणि त्रिपाठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगवी, सुस रोड, पाषाण, सुतारवाडी, चांदणी चौक, कोथरूड, कोंढवा, लोहगाव मधील तब्बल 18 ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले. यातील 12 गुन्हे उघड झाले असून विमानतळ, हिंजवडी, कोथरूड भागातील गुन्हे आरोपींनी दाखविलेल्या आणखी चार ठिकाणचे गुन्हे अद्याप दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ते गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, प्रसाद गोकुळे, उपनिरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक फौजदार, भालेराव, पोलीस नाईक रोहिदास बोऱ्हाडे, कैलास केंगले, नितीन दांगडे, पोलीस शिपाई शशिकांत देवकांत, अरुण नरळे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सॉक्‍समध्ये हत्यार लपवून घरफोडी
रवीकिरण यादव व अनुपम त्रिपाठी हे दोघे भरदिवसा घरफोडी करत असत. यामध्ये ते पायातील सॉक्‍समध्ये घरफोडीचे हत्यार लपवून ठेवत असत. परिसरातील बंद घरांची पाहणी करुन अवघ्या तासाभरात घरातील मुद्देमाल चोरी करत असत. यातील त्रिपाठी हा रियल इस्टेट एजंटचे काम करीत आहे. तर यादव याचे बाणेरमधील ताम्हाणे चौक येथे दुचाकीचे गॅरेज आहे. दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील असल्याने महाराष्ट्रात चोरी केलेले दागिने ते उत्तर प्रदेश मधील ओळखीच्या सराफाला विकत असत. त्यांनी विकलेले दागिने हस्तगत करण्याची कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)