सरसंघचालकांच्या तीन दिवसांच्या बौद्धिकासाठी राहुल गांधीना निमंत्रण देणार

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या तीन दिवसांच्या बौद्धिकाच्या कार्यक्रमाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाकडून निमंत्रण दिले जाण्याची शक्‍यता आहे. संघाच्या सूत्रांकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. राहुल यांच्याबरोबरच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही निमंत्रण दिले जाणार असल्याचे या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

विभीन्न विचारसरणीच्या नेत्यांना संघाचा परिचय व्हावा, संघाची कार्यपद्धती माहिती व्हावी यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना नेहमीच निमंत्रणे पाठवली जातात. त्यात यंदा राहुल गांधी यांचाही समावेश केला जाणार आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुड या संघटनेशी केली होती. मुस्लिम बद्ररहुड ही संघटना सर्व इस्लामिक कट्टरपंथीय दहशतवादी संघटनांची मातृसंस्था मानली जाते आज या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून ओळखले जात असून अनेक मुस्लिम देशांनीच मुस्लिम ब्रदरहुडवर बंदी घातली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर थेट त्यांनाच मोहन भागवतांच्या बौद्धिकासाठी निमंत्रण दिले जाणार असल्याच्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संबंधात अधिक माहिती देताना संघाचे प्रचार प्रमुख अरूणकुमार यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यात मोहन भागवत यांची तीन दिवसांची एक व्याखानमाला होणार आहे. संघाच्या नजरेतून भारताचे भविष्य या विषयावर ते यावेळी बोलणार आहेत.

या कार्यक्रमासाठी काही निवडक निमंत्रकांनाच निमंत्रण देण्यात येणार आहेत. दिल्लीच्या विज्ञान भवनात 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या अवधीत भागवत यांची ही व्याख्याने होणार आहेत. यात सर्व महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्‍नावर सरसंघाचालक संघाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)