सरपंचांनी पदाचा वापर गाव हितासाठी करावा

मंचर- चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतूनन मोठ्या प्रमाणात गावचा विकास होत असला तरी त्याचा हिशोब व्यवस्थित ठेऊन ग्रामस्थांना माहितीसाठी उपलब्ध करुन दिला पाहिजे. सरपंचांनी सरपंचपदाचा वापर गावच्या हितासाठी करावा.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावविकासासाठी असणारा निधी जास्तीत जास्त दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आंबेगाव तालुका सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील बोलत होते. यावेळी सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, तालुकाध्यक्ष अनिल वाळुंज, जिल्हा निमंत्रक भाऊसाहेब मरगळे, राज्य संघटक कैलास गोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष निलेश स्वामी थोरात, सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष संतोष सैद, महिला अध्यक्षा अनिता भोर तसेच तालुक्‍यातील 85 सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. यावेळी बोलताना आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले की, नवनिर्वाचित सरपंचांनी आपले अधिकार आणि कर्तव्य याची सर्वप्रथम जाणीव करुन घेतली पाहिजे. गावचा विकास करताना पाणी, आरोग्य, शिक्षण याला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. ग्रामपंचायतीचा आर्थिक कणा असलेले पाणीपट्टी आणि घरपट्टी वेळेत वसूल होण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सेवकांनी प्रयत्न केले पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)