सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिक्रापूर- सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की केल्याप्रकरणी महा ई-सेवा केंद्र चालकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोरेगाव भीमा येथील मंडलाधिकारी चंद्रशेखर मुरलीधर ढवळे (रा. भगवतीनगर पाषाण, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव भीमा येथील महा ई-सेवा केंद्र चालक उमाकांत भरत पांडे (रा. शिक्रापूर इंदिरा कॉलनी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील मंडलाधिकारी हे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना तेथे शेजारी असलेल्या महा ई-सेवा केंद्र चालकाने काही कागदपत्रे सही करण्यासाठी आणली होती. यावेळी मंडलाधिकारी यांनी प्रतिज्ञापत्र धारकाचे छायाचित्र (फोटो) जुने आहे, असे म्हटल्याच्या कारणावरून महा ई-सेवा केंद्राच्या संचालकाने मंडलाधिकाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.
कोरेगाव भीमा येथे मंडलाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच उमाकांत पांडे यांचे महा ई-सेवा केंद्र आहे. पांडे हे नेहमी मंडलाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञापत्रावर सह्या करून घेण्यासाठी येत असतात. 26 सप्टेंबर रोजी मंडलाधिकारी चंद्रशेखर ढवळे आणि त्यांचे मदतनीस दीपक पवार हे कार्यालयात कामकाज करताना, त्याठिकाणी महा ई-सेवा केंद्र चालक उमाकांत पांडे हे प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी आले. त्यांनतर मंडलाधिकारी ढवळे यांनी प्रतिज्ञापत्र तपासले असता त्यांना त्यावर प्रतिज्ञापत्रधारकांचे जुने छायाचित्र (फोटो) दिसले. त्यामुळे ढवळे यांनी पांडे यांना प्रतिज्ञापत्रधारकाचे नवीन फोटो लावा, असे समजावून सांगत असताना पांडे यांनी “तुम्ही सह्या का करत नाही’ असे म्हणून हुज्जत घातली. त्यावेळी पांडे यांनी मंडलाधिकारी ढवळे यांना तेथे असलेल्या व्यक्‍तीसमोर शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की देखील केली. दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. याचा गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)