सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला

सातवा वेतन आयोगाची थकबाकी गणेशोत्सवात मिळणार
मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर गणपती बाप्पा पावला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी येत्या गणेशोत्सवापूर्वीच मिळणार आहे. थकबाकीचा सुमारे पाच हजार कोटींचा पहिला हप्ता थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा होणार आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली.

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, त्याची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी सरकारी कर्मचारी संघटनांनी अनेक आंदोलने करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव लक्षात घेता थकबाकीची रक्‍कम गणेशोत्सवापूर्वी जमा करण्यात येणार आहे. चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना 25 हजार रूपये, तृतीय श्रेणी कर्मचा-यांना 50 हजार, द्वितीयश्रेणी कर्मचा-यांना 75 हजार तर प्रथमश्रेणी कर्मचाऱ्यांना 1 लाख रूपये मिळणार आहेत. प्रत्यक्षात वाढीव पगार हातात पडेपर्यंत दिवाळीची वाट पाहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)