सरकारचे सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ – मल्लिकार्जून खर्गे

कोल्हापूर – भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देते आहे. हे धोरण निषेधार्ह असून, महाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी असल्याचे कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात यात्रेच्या उदघाटनाच्या वेळी संबोधित करताना खर्गे यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खर्गे म्हणाले की, भारतात अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण कोणत्याही पंतप्रधानांनी जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग केले नाहीत. परंतु, मोदी सरकारच्या काळात देशातील वातावरण प्रचंड कलुषित केले जात आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी आपला स्तर सोडला नाही. पण मोदींनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेस देशामध्ये एकता कायम ठेवण्यासाठी लढाई लढते आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश कॉंग्रेसने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी नाही. तर ही तत्वांची लढाई आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, वीज दरवाढ, गॅसचे वाढलेले भाव, पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेले दर यांमुळे सामान्य माणूस भरडला आहे. या सर्व प्रश्नांवर सामान्य जनतेशी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)