सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी संघर्षयात्रेचे आयोजन

आ.आनंदराव पाटील : खर्गे, चव्हाणांसह आमदार होणार सहभागी
सातारा,दि.26 प्रतिनिधी- भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी तसेच सत्तेत आल्यानंतर देखील दिलेल्या आश्‍वासनांचा व घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी कॉंग्रेसच्यावतीने राज्यभर संघर्षयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संघर्षयात्रा दि.2 सप्टेंबर रोजी संघर्षयात्रा कराड येथे येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आ.आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघर्षयात्रेची सुरूवात दि.31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेवून करण्यात येणार आहे. यानंतर सांगली व नंतर सातारा जिल्ह्यात कराड येथे संघर्षयात्रेचे आगमन होणार आहे. यात्रेत कॉंग्रेसचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील तसेच राज्यातील आमदार, खासदार व प्रदेश कॉंग्रेस कार्यकारणीचे सदस्य तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
सरकारने चार वर्षात केलेल्या घोषणांचा जाब यात्रेच्या माध्यमातून विचारला जाणार आहे. सत्तेत येण्यापुर्वी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. ते न करता नोटाबंदीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले. आमच्या सरकाच्या कालावधीत कोणताही निकष लावता देशातील सर्वात मोठी 72 हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. मात्र हे सरकारकडे कर्जदारांची संपुर्ण माहिती असताना देखील ऑनलाईन फॉर्म भरण्याची वागणून दिली तरी ही शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झालाच पाहिजे ही मागणी देखील संघर्षयात्रेच्या माध्यमातून लावून धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर देशात व राज्यात रोजगार निर्माण केल्याची घोषणा केली जाते मात्र दिवसेंदिवस युवक बेरोजगार होवू लागला आहे तर दूसऱ्या बाजूला श्रमाचा मोबदला युवकांना मिळाला जात नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, या विरोधात देखील आवाज उठवला जाणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)