सरकारकडून आठ सदस्यीय लोकपाल शोध समिती स्थापन

नवी दिल्ली – मोदी सरकारने गुरूवारी आठ सदस्यीय लोकपाल शोध समिती स्थापन केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील ही समिती भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा असणाऱ्या लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावांची शिफारस करेल.

कॉंग्रेस पक्षाच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत सरकारने संबंधित समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या सदस्यांमध्ये भारतीय स्टेट बॅंकेच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य, प्रसार भारतीचे अध्यक्ष ए.सुर्यप्रकाश, इस्त्रोचे प्रमुख ए.एस.किरणकुमार यांचा समावेश आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सखारामसिंह यादव, गुजरातचे माजी पोलीस प्रमुख शब्बीरहुसेन एस.खांडवावाला, निवृत्त आयएएस अधिकारी ललित के.पन्वार आणि माजी सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनाही समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. लोकपाल कायद्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या घडामोडीसंदर्भात सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकपाल निवड गटाच्या बैठकांवर कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सातत्याने बहिष्कार टाकला आहे. गटामध्ये पूूर्ण सदस्यत्व मिळाले नसल्याची भूमिका घेत खर्गे यांनी ते पाऊल उचलले. दरम्यान, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मध्ये मंजूर झाला. त्यानंतर जवळपास पाच वर्षांनी लोकपाल शोध समितीची स्थापना झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)