समाज माध्यमांवरच्या पूर्वकल्पनेनेही

वीजपुरवठा खंडीत करता येणार
नगर – थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी लेखी नोटीस देणे बंधनकारक होते. परंतु, आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्‌स ऍप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक 195/2017 च्या निकालानुसार आयोगाने राज्यात महावितरणला थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार व्हॉट्‌स ऍप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठविण्यास परवानगी दिली आहे. डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे. महावितरणने मागील कांही वर्षापासून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. महावितरणने दोन कोटी पाच लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)