समाजसेवक आण्णा हजारे यांच्या उपोषणाची दखल घ्या

पिंपरी– लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतीमालास दीडपट हमीभाव मिळावा आ विविध त्यादी मागण्यांसाठी सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाज सेवक आण्णा हजारे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांच्या या मागण्यांची दखल गेण्याचे निवेदन मानवी हक्क संरक्ष समिती आणि जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अपर तहसीलदार हनुमंत निकम यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

जेष्ठ समाज सेवक आण्णा हजारे यांच्या शासनाकडे दिलेल्या मागण्या या जनहिताच्याच आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या असतील तरीदेखील अंमलबजावणी होत नाही. तर मग संविधानिक तरतुदीनूसार आयोग नेमुन लाखो- करोडो रुपये खर्च करुन त्यांनी दिलेल्या शिफारशी लागुच होणार नसतील तर जनतेच्या पैसाचा अपव्यय का केला जातो? महाराष्ट्र शासनाने लोकपाल नियुक्ती अद्याप झालेली नाह. शासनाने शेतकऱ्यांना शेतीमालाला दीडपट हमी भाव देण्याचे मान्य करुन ही तो मिळत नाही.

संविधानिक मागण्यांसाठी आण्णा हजारे उपोषण करीत आहेत. सहा दिवस उलटले असतानादेखील उलट लेखी स्वरुपात केलेल्या मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपोषणाला शुभेच्छा देऊन, या आंदोलनाची व तमाम भारतीयांची क्रुर चेष्टा केली आहे. पुरस्कार मागण्या मान्य न झाल्यास परत पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. या उपोषण दरम्यान त्यांच्या जीवीताचे बरेवाईट झाल्यास त्यास शासनासच जबाबदार धरले जाईल, असे या निवदनात नमूद केले आहे.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉ. हरिदास आभिषेक,शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला शहरध्यक्षा कीर्ती जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, युवक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, सहकार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, संपर्कप्रमुख साहील कांबळे, संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.