अणे- पिंपरी-चिंचवड तंत्रनिकेतन निगडी अव्वल इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या पुणे जिल्हा डी-1 झोन फुटबॉल स्पर्धा समर्थ शैक्षणिक संस्थेच्या क्रीडा संकुलामध्ये पार पडली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून आठ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये सीडब्ल्यूआयटी – पुणे, शासकीय तंत्रनिकेतन – अवसरी, वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतन – पुणे, पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन – निगडी, समर्थ तंत्रनिकेतन – बेल्हे, समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी – बेल्हे, डी. वाय. पाटील कॉलेज – लोहगाव, शाहू तंत्रनिकेतन – पुणे आदी संघांनी सहभाग नोंदवला.
अंतिम सामना पिंपरी-चिंचवड तंत्रनिकेतन निगडी व वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतन पुणे यांच्यामध्ये चुरशीचा ठरला. यामध्ये पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन, निगडी संघ विजेता ठरला, तर वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतन पुणे उपविजेता ठरला. पंच म्हणून प्रशांत बेलवटे,हर्षल बोऱ्हाडे आणि गणेश कणसे यांनी उत्कृष्ट काम केले. समालोचन प्राध्यापक फिजा चौधरी यांनी व गुणलेखन प्रा. सचिन दातखिळे यांनी काम पाहिले. सर्व संघ आणि सामन्याची व्यवस्था पाहण्याची चोख जबाबदारी प्राध्यापक सुमित पिंगळे, सागर तांबे व क्रीडा शिक्षक प्रा. गणेश कणसे यांनी पार पाडत विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ. वैभव आहेर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा