समर्थ पोलिसांनी तडीपार गुंडास पाठलाग करुन घेतले ताब्यात

समर्थ पोलिसांनी तडीपार गुंडास पाठलाग करुन घेतले ताब्यात
पुणे,दि.6- समर्थ पोलिसांनी तडीपार गुंडास पाठलाग करुन ताब्यात घेतले. ही कारवाई रास्ता पेठेत उत्तरा चौकात करण्यात आली.
समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई निलेश साबळे आणि पोलीस शिपाई अनिल शिंदे हे सोमवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत फिरत होते. यावेळी सराईत गुन्हेगार व तडीपार गुंड सागर उर्फ रॉंग श्रीकांत पवार(रा.मंगळवार पेठ) हा त्यांना बघुन पळून जात होता. साबळे आणी शिंदे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
सागर उर्फ रॉंग या सराईतास 12 सप्टेंबर रोजी पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तडीपार आदेशाचा भंग करुन तो परिसरात फिरत होता. पोलीस शिपाई साबळे आणी शिंदे यांनी त्याला ताब्यात घेऊन तडीपार मुदतीत परत येण्याची परवानगी घेतली आहे काय ? याची खात्री केली. तेव्हा त्याने कसलीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्याच्याविरुध्द पोलीस शिपाई साबळे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.