श्रीनाथ भिमाले यांच्याविरुद्ध अरविंद शिंदे यांनी दाखल केला मानहानी व अब्रुनुकसानीचा दावा

पुणे – महापालिका मुख्यसभेत केलेल्या वक्तव्याबाबत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या विरोधात कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी मानहानी आणि अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.

भिमाले यांच्याविरोधात शिंदे यांनी 23 मे रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. महापालिकेच्या 21 मे रोजी झालेल्या सभेत भिमाले यांनी शिंदे यांनी “फ्रॉड’ हा शब्द उच्चारल्याने शिंदेंनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पालिकेतील अधिकारी किशोर पडळ हे भिमाले यांच्या कार्यालयात वेळेत न आल्याबद्दल त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्या अधिकाऱ्याने पाच मे रोजी तक्रारही दाखल केली होती. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या सभेत केली होती. त्यावेळी भिमाले हे चिडले. त्यांनी माज्याबद्दल अपशब्द वापरले. “अरविंद शिंदे हा फ्रॉड असून, तो लोकांना ब्लॅकमेल करतो’, असे आरोप भिमाले यांनी या सर्वसाधारण सभेत केले होते. नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकरासमोर भिमाले यांनी ही वाक्‍ये उच्चारली आहेत, असे शिंदे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी दिवाणी न्यायालयात 25 कोटी रुपयांचा मानहानी आणि अब्रुनुकसानीचा स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती शिंदे यांचे वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. शिंदे यांच्यावतीने ऍड. ठोंबरे, ऍड. जयपाल पाटील, ऍड. हितेश सोनार, ऍड. तुषार माने यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)