सभागृहाची गरीमा टिकवण्यासाठी प्रयत्न करू…

पुणे – महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यामध्ये महापालिका मुख्यसभेत झालेल्या हमरीतुमरीचे प्रकरण आता थेट न्यायालयात गेले असून, शिंदे यांनी सोमवारी भिमाले यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयातच खटला दाखल केला. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
वास्तविक सभागृहाची गरीमा पाळणे आवश्‍यक होते मात्र भिमाले यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. सभागृहात विरोधक असलो तरी विकासात सर्वांनी एकत्रित काम करणे अपेक्षित आहे. मात्र असे न करता केलेल्या वक्तव्याची दिलगिरीही सभागृहनेत्यांनी अथवा भाजपतील वरिष्ठ सदस्यांनी व्यक्त केली नसल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

तसेच सत्तेतून गेल्यामुळे विरोधक असे बोलत आहेत अशी मुजोरीची भाषाही सभागृहनेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याचे शिंदे म्हणाले. वास्तविक आम्ही गेल्या 10 वर्षापासून सत्तेत नाही. त्यामुळे सभागृहनेत्यांच्या या वक्तव्याला काहीच आधार नसल्याचे शिंदे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस गटनेत्यांशी बोलायची वेळ अजूनही गेली नाही. त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू शकतो. मात्र असे प्रकार पुढे होऊ नयेत. सभागृहाची गरीमा टिकली पाहिजे, यासाठी नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)