सफरचंद खाणं दातांसाठी नुकसानकारक?

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने भलेही आपण आजारांपासून दूर राहू. पण दातांच्या डॉक्‍टरांचा धंदा नक्कीच वाढू शकतो. म्हणजे सफरचंद आपल्या दातांना नुकसानकारक ठरू शकतं.नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आलीय. हा निष्कर्ष डेन्टिस्टच्या सर्वेक्षणात पुढे आलाय. वेबसाइट फीमेल फर्स्ट डॉट को डॉट यूकेच्या एका रिपोर्टनुसार पाच पैकी चार तज्ज्ञांनी सांगितलं की, फळ खाल्ल्यानं दात खराब होतात.

दातावर प्लाक तयार होतं आणि दंतवल्क (एनॅमल) क्षय होतं. तर तिसऱ्यानं सांगितलं की, चॉकलेट आणि बिस्किटसोबत सफरचंद खाल्ल्यानं दात आणि हिरड्यांचे नुकसान होतं. किंग्ज डेंटल इंस्टिट्यूटचे शोधकर्ते डेविड बर्टलेटच्या निष्कर्षानुसार फळ खाल्ल्यानं दातांचं तितकंच नुकसान होतं जितकं कार्बोनेटयुक्त पेय पिल्यानं होतं.

फळांचा ज्युस प्यायल्यानं हिरड्यांचे नुकसान होतं, असंही अर्ध्या तज्ज्ञांनी सर्वेक्षणादरम्यान इशारा देत सांगितलं आहे. आता ऍपल अ डे किप्स डॉक्‍टर अवे, या तत्त्वाने आपण जर सफरचंद खात असू, तर अशा प्रकारे डॉक्‍टर दूर जाण्याऐवजी अधिक लवकर जवळ येऊ शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)