सनीचे फोटो विकून तो कमवायचा पैसे

सध्या आपल्या जीवनावर आधारित वेबसिरीजमुळे पूर्वश्रमीची पोर्नस्टार आणि आताची बॉलीवूडची अभिनेत्री सनी लिओन चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्या जीवनासंबंधी अनेक खुलासे करण्यात येत आहेत. सनी लिओन 2013 मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ द ईअर म्हणून निवडली गेली.

अमेरिकेत तिची फॅन फॉलोविंग तेव्हा प्रचंड वाढली. तिचा ऑटोग्राफ फोटो यादरम्यान मिळवणे ही एक मोठी गोष्ट मानली जात असे. पण ही बाब एका व्यक्‍तीसाठी अगदी सामान्य होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही व्यक्‍ती तिचा भाऊ असून घरातच तो तिच्या फोटोवर तिची सही घ्यायचा व 10-15 डॉलरमध्ये तो फोटो आपल्या मित्रांना विकायचा. सनीचा एकूलता एक भाऊ संदीप वोहरा हा अमेरिकेमध्ये शेफ आहे. करनजीत ते सनी लिओन हा तिचा प्रवास संदीपने प्रत्यक्ष बघितलाच नाही तर त्याचा तिच्या अनेक वादग्रस्त निर्णयामध्ये सहभागही राहिला आहे.
करनजीत जेव्हा सनी लिओन बनली नव्हती तेव्हांपासून संदीपला घरी सनी म्हणून पुकारले जायचे.

घरातील संदीप अशी एकमेव व्यक्‍ती होती, ज्याला हे माहित होते की, करनजीत न्यूड फोटोशूट करते. करनजीत हे तिचे नाव बदलून स्वत: संदीपनेच तिला सनी लिओन हे नाव दिले. सनी लिओनने पुढे जेव्हा पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला तेव्हाही संदीपने तिच्या निर्णयाचा सन्मान ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)