सद्‌गुरु श्री गजानन महाराज यांचा 141 वा प्रकटदिन सोहळा

गजानन महाराज मंदिरात दि. 21 ते 25 फेब्रुवारी अखेर धार्मिक कार्यक्रम
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) – अर्कशाळानगर येथील गजानन महाराज मंदिरात प. पू. सद्‌गुरु श्री महाराजांच्या 141 व्या प्रकटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 21 ते सोमवार, दि. 25 फेब्रुवारीअखेर हा प्रकटदिन सोहळा होणार असल्याची माहिती गजानन महाराज भक्‍त मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली.
गुरुवार, दि. 21 रोजी सकाळी 7 ते 12.30 श्री गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसांचे सामुदायिक पारायण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 ते 7 पुरुषांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, दि. 22 रोजी सकाळी 7 ते 8.30 संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री गणेश मूर्तीवर महाअभिषेक होणार आहे. सायंकाळी 4.30 ते 6 शाहूपुरी येथील अक्षय भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6.30 ते 7.30 सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण व सायंकाळी 7.30 8.00 महाआरती व नामस्मरण होणार आहे.
शनिवार, दि. 23 रोजी सायंकाळी 5 ते 7 ह. भ. प. कु. विद्यागौरी सु. ठुसे यांचे “संत महिमा’ या विषयावर सुश्राव्य किर्तन होणार आहे. रविवार, दि. 24 रोजी सकाळी 8 ते 11 मुख्य देवता स्थापना व नवग्रह होम, महापूजा नवग्रहस्थापना, श्री पवमान याग, शांती पाठ, पुण्याहवाचन, ब्रह्मादिमंडल स्थापना आदी धार्मिक विधी होणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 6 श्री गजानन महाराज भक्‍त मंडळाच्या भगिनींचा भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार, दि. 25 रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत श्रींच्या मूर्तीवर “गण गण गणात बोते’ या सिद्धमंत्राच्या नामघोषात महाअभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर पूजा अर्चा, आरती व नामस्मरण होणार आहे. सकाळी 9 ते 11 श्री गणेश याग, श्री दत्त याग, स्थापित देवतांची पूजा, बलिदान, पूर्णाहुती, श्रेयोदान आदी कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 11 ते 11.30 श्री गजानन विजय ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे सामुदायिक वाचन होणार आहे. दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 माऊली भजनी मंडळ करंजे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम होणार असून रात्री 7.30 ते 8.00 महाआरती होणार आहे. तरी सर्व भाविक भक्‍तांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व भक्‍त मंडळास सहकार्य करावे असे नम्र आवाहन भक्‍त मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.