सदन कमांडला नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखाची फसवणूक

सदन कमांडला नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखाची फसवणूक
पुणे,दि.15 : सदन कमांडमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने तीघांची 12 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चार जणांविरुध्द बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम महादेव शेडगे(27,रा.रहाटणी), सागर विश्‍वासराव भगत(31,रा.वाल्हेकरवाडी), नारायण दहीफळे(रा.चाकण), गणेश परदेशी (रा.शिवणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शरद कुंडलिक गोयकर(26,रा.वाल्हेकरवाडी) यानी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी संगणमत करुन आणी विश्‍वास संपादन करुन फिर्यादी तसेच अंकुश अंबादास धरणे आणी श्रीराम चव्हाण यांना सदन कमांड मिलेटरी इंजिनिअरींग येथे लोअर डिव्हीजन क्‍लर्क व स्टोअर किपर म्हणून नोकरी लावतो असे सांगत 12 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.