सत्ताधा-यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले

मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करा


विरोधकांना एकत्रित आणण्याची जबाबदारी माझी


सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग जाहीर करा

कोल्हापूर – मराठा आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्‍य आहे. घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ , माजी खासदार निवेदिता माने हे प्रमुख उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीत साप सोडण्यासंदर्भात जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले. आंदोलन शांततेत सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून आगीत तेल ओतले, अशीही टीका शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर सोडवावा राज्यात सध्या निर्माण झालेली परिस्थिती राज्याच्या हिताची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे असे आव्हानही शरद पवार यांनी दिले आहे. भाजपाने सत्तेवर येताच शंभर दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी भूमिका घेतली होती. आता न्यायालयीन प्रक्रिया पुढे करून मराठा आरक्षण लांबवणे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरूस्ती केल्याने ते शक्‍य आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे सरकार आहे त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)